।। श्री राम समर्थ ।।

|| समर्थशिष्य योगीराज सद्गुरू कल्याण स्वामी महाराज ||

कल्याण स्वामी ओळ्खले जातात ते समर्थ रामदास स्वामी यांचे लेखनिक म्हणूनही. दासबोधासह बहूतेक सर्व समर्थ साहित्य हे कल्याण स्वामींच्या हातचे उपलब्ध आहे. समर्थांचा संचार अनेक ठिकाणी असे कल्याण स्वामी सर्वत्र त्यांच्याबरोबर असत. समर्थांच्या मुखातून जे काही उत्स्फूर्त काव्य होत असे ते कल्याण स्वामी लिहून घेत. इ.स.१६५२ ते इ.स.१६६० या काळामध्ये ग्रंथराज दासबोधाची रचना शिवथरघळीमध्ये झाली. तो समर्थांनी सांगीतला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला. चाफळ श्रीराम मंदिराचे काम चालू असताना समर्थांनी एकाच बैठकीमध्ये २०५ मनाचे श्लोक सांगीतले व कल्याण स्वामींनी ते लीहून घेतले. कल्याण स्वामी एका रत्रीत दासबोध लीहून काढत आशा आनेक कथा त्यांच्या लेखनाबद्दल सांगितल्या जातात. धुळे येथील . श्री समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये. आसलेले २५० पानांचे . कल्याणपोथ्या. नावाचे बाड आज ही याची साक्ष देते. त्यांची झोळी ही एखाद्या गोणी इतकी मोठी दिसे. त्यामध्ये विविध ग्रंथ लेखन साहित्य, शाई, बोरूचे टाक इ. गोष्टी असत. त्यांचे हस्ताक्षर आतिशय वळणदार होते. कल्याण स्वामींचे गुरुबंधू अ‍नंत कवि म्हणतात -

. स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहीतसे|.

ते न थांबता तासन् तास लिहीत. समर्थांनी उस्फूर्तपणे काव्य करावे व कल्याण स्वामींनी ते तात्काळ लीहून घ्यावे आसे आनेकदा होत असे. लिहीताना खाडाखोड, विसरणे इ. होत नसे. ते नवीन पाने कधी बनवतात, शाई कधी तयार करतात याचा पत्ता लागत नसे. या सर्वाचेन कारण होते त्यांचा योगाभ्यास. योगाभ्यासामुळे त्यांची एकाग्रता प्रचंड होती. समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामी लिहीतात -

कल्याण नामा ग्रंथ विस्तारी | उत्कट कीर्ती विश्वाभीतरी |
देहांत साधने गुरुआज्ञेकरी | कल्याण चराचरी पावला नाम ||