।। श्री राम समर्थ ।।

|| समर्थशिष्य योगीराज सद्गुरू कल्याण स्वामी महाराज ||


इ.स.1678 ते इ.स.1714 या कालावधीमध्ये योगीराज कल्याण स्वामींनी मराठवाडा आंध्रप्रदेश कर्नाटकच्या सीमा भागामध्ये 250 हून अधिक मठांची स्थापना केली. जागोजागी कीर्तने दासबोधाचा प्रसार इत्यादीद्वारे सामान्य जनतेला उपासना मार्गाला लावले. त्यांची निस्पृहता, विरक्ति, ब्रम्हनिष्ठा, उपासना इत्यादिमुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यामध्ये मुख्यत:
  • जगन्नाथ तथा जगज्जीवन स्वामी - तडवळे
  • रामजि दादा - बारामती
  • दासगुणु महाराजांचे गुरु वामनशास्त्री इस्लामपूरकर हे कल्याण स्वामी परंपरेतिल.
  • प.प. भगवान श्रीधर स्वामी यांच्या आई वडिलंनी ज्या दत्तात्रय बुवांचेकडून अनुग्रह घेतला ते देखिल याच परंपरेतिल होत.