।। श्री राम समर्थ ।।

|| समर्थशिष्य योगीराज सद्गुरू कल्याण स्वामी महाराज ||
बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली।
तयाचे पदीँ चित्तवृत्यादि ठेली।
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी।
नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
श्रमहरणितटाकीं स्वामी कल्याणराजा।
परम दिनदयाळू नांदतो स्वामी माझा।
सदय ह्रदय ज्याचें ध्यान हे आठवीतां।
परम सफल येतो मोक्ष कल्याण हाता॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥